cm uddhav thackeraypolitics- दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (cm uddhav thackeray)यांनी जाहीर केलं आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली भाजपासह वारकरी संप्रदायाची मागणी अखेर आज पूर्ण झाल्यानंतर यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची जी मागणी होती. हिंदुत्व प्रेमी जनतेची मागणी होती. किंबहुना मंदिरावर असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी होती. त्यांचा रेटा दबावाने या ठिकाणी शासनाला निर्णय घ्याव लागला. उशीरा का होईना, घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो.” असं दरेकर यांनी म्हटलं आहे. (politics)

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी

तसेच, ”खरंतर हा निर्णय अगोदरच व्हायल हवा होता. कारण, जर मंडई, लॉन्स, अगदी रेस्टॉरंट-बार, जिम व इतर सार्वजिनक गर्दीची स्थळं मोकळी केलेली असतील. तर वारकरी संप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने ही भूमिका मांडलेली असताना मला वाटतं हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. वारकरी संप्रदायाच्या मागे हिंदुत्वाच्या भावनेतून भाजपा आहे. परंतु, प्रतिष्ठा व अहंकारापोटी हा निर्णय होत नव्हता. मात्र उशीरा का होईना एक दिलासा या सरकारने दिलेला आहे. याचं मी स्वागत करतो. असं देखील दरेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून भाजपाने आक्रमक धोरण स्वीकारले होते. शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी वाढत होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.