bjp



politics- सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या सवयीला जागत पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. 

खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले. पण भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय काही गेली नाही, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (politics)

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट


थोरात म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. 

मात्र, फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याआधी त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते असेही थोरात म्हणाले.

काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. 2017 मध्ये महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता. 

तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का, असा सवालही थोरात यांनी केला. काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.