politics news
politics news-
राज्य सरकार लवकरच पडणार असल्याचं विधान वारंवार भाजपाकडून केलं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाष्य केलं होतं. कार्यकर्ते, आमदरांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय, असं त्यांनी म्हटलं होतं. कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांना हा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर

पत्रकार परिषदेदरम्यान, चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांच्या (ajit pawar) वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना “अजित पवारांबाबत मी काय म्हणाव?,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.(politics news)

“कोणी तुमचे कारवाईसाठी हात बांधले, पाय बांधले की तोंड बांधलं. तुमचं तोंड सततच सुरू आहे. त्यांना उद्धव ठाकरे हेदेखील थांबवू शकत नाही. त्यांच्या तोंडामुळे शिवसेनेचं किती नुकसान झालंय हे निवडणुकीत समजेल. हा माझा नाही शिवसेनेचा विषय आहे,” असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

“सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधीपक्षांना सरकार पडणार अस म्हणावंचं लागतं. कार्यकर्ते बरोबर रहावेत, आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी त्यांना सारखं गाजर दाखवायंच काम करावं लागतं. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे तिघं या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यत या सरकारला काहीही होणार नाही. त्यांचे १०५ लोक निवडून आलेले असतानाही सरकार स्थापण्याची संधी मिळाली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळे सारखं ते काही ना काही काड्या पेटवायचं काम करत आहेत,” असं अजित पवार म्हणाले होते.