cristiano-ronaldo-finally-defeated-corona

ज्युव्हेंट्स संघाचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने Cristiano Ronaldoअखेर कोरोनाला पराभूत केले असून नुकतीच त्याची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. रोनाल्डोला 13 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. व त्यामुळे तो आपल्या घरीच क्वारंटाईन झाला होता. तसेच रोनाल्डोला पोर्तुगालच्या एक आणि ज्युव्हेंट्स संघाच्या चार सामन्यांना मुकावे लागले होते.   

ज्युव्हेंट्स क्लबने यासंदर्भात माहिती देताना, रोनाल्डोची आज कोरोना चाचणी करण्यात आली. व या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ख्रिस्टियानो रोनाल्डो मागील 19 दिवसांनंतर कोरोनामुक्त झाला असल्याचे क्लबने सांगितले. 13 ऑक्टोबरला रोनाल्डोचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. मात्र त्यावेळी त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. शिवाय यापूर्वी दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत देखील रोनाल्डोचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी


दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे 29 ऑक्टोबरला बार्सिलोना विरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स लीगमधील सामन्यास ख्रिस्टियानो रोनाल्डोला सहभागी होता आले नाही. चॅम्पियन्स लीगमधील ग्रुपस्तरिय सामन्यात बार्सिलोना संघाने ज्युव्हेंटसवर 2 - 0 ने विजय मिळवला होता. यासह पोर्तुगालकडून होणाऱ्या सामन्यात देखील त्याला सहभागी होता आले नव्हते.