corona pandemic


कोरोनाकाळात (corona pandemic)सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतानी स्वत:चं आयुष्य संपवलं. यातच आता क्रिकेट  (cricket) विश्वालाही हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा माजी अंडक-19 क्रिकेटपटू मोहम्‍मद सौजिबनं (mohammad sozib) आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहम्मदनं 14 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी आत्महत्या (suicide)केली. 21 वर्षीय सौजिब अंडर-19 वर्ल्ड कप (Under*19 Cricket World cup) संघातही सामिल होता. स्टॅंड बॉय खेळाडू म्हणून त्याचा समावेश करण्यात आला होता.

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


मोहम्मद सौजिबनं 2018मध्ये शिनेपुकुरकडून लिस्ट ए संघाकडून पदार्पण केले होते. त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर 2018मध्ये त्याला संघात स्थान मिळे नाही. बांगाबंधु टी-20 कपमध्येही त्याची निवड झाली नाही. बांगलादेश क्रिकेट (cricket) बोर्ड गेम डेवलपमेंट्स मॅनेजर अबु इनाम मोहम्‍मद यांनी सांगितले की, या स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे कदाचित सौजेबनं हे धक्कादायक पाऊल उचलले असावे.

बीडी क्रिकटाइमशी संवाद साधताना अबु यांनी सांगितले की, सौजिब सैफ आणि आफिफ हुसेन यांनी 2018 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये होते. वर्ल्ड कपमध्ये स्टॅंडबॉय होते. आशिया कपमध्ये तो श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र त्यानं घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही खूप दु:खी आहोत.

दरम्यान, मोहम्‍मद सौजिबनं हे पाऊल डिप्रेशनमुळे उचलले आहे की, आणखी कोणत्या कारणानं हे अद्याप समोर आले नाही आहे. मात्र गेल्या वर्षापासून मोहम्मद नियमित क्रिकेट खेळत नव्हता. तो केवळ ढाकामध्ये प्रीमिअर लीग खेळला होता.