covid-19-all-religious-places-including-temples

राज्यभरात मंदिरे खुली (Temple Open) करण्याची मागणी जोर धरु लागलीय. यावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका देखील झालीय. पण आता पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासदंर्भातील आवाहन केलंय. सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह (Temples Open) सर्व प्रार्थनास्थळे (religious places)उघडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

मंदिरे खुली करणे हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद राज्याला मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले. 


Must Read

1) मंदिरं उघडण्याच्या निर्णयावर काँगेस नेत्याचा सवाल

2) दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

3) शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुलं, मात्र...

4) ऑस्ट्रेलियाचे माईंड गेम सुरू, स्मिथचा टीम इंडियाला इशारा

5) KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'

6) पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की...


करोना प्रादुर्भावाच्या काळात सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. या काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. 

नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.