court-said-that-marriage-between-the-children

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (high Courtकाका, मामा, मावशीच्या मुलामुलींशी लग्न करण बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिलाय. याचिकाकर्त्याला आपल्या काकांच्या मुलीसोबत लग्न करायचे होते. जी नात्यात त्याची बहीण लागते. हे करणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले. 

जेव्हा ही मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा ते लग्न (Married) करतील, परंतु तेव्हाही हे बेकायदेशीर असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. २१ वर्षीय तरुणाने १८ ऑगस्टला लुधियाना जिल्ह्याच्या खन्ना शहर-२ ठाण्यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३६३ आणि ३६६ ए अंतर्गत तात्काळ जामिना करीता पंजाब सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. 

Must Read

1) Coronavirus: पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?

2) COVID19 : पंढरपूरमध्ये कर्फ्यूची घोषणा

3) भारतीय सीमेत दोन पाकिस्तानी ड्रोन्सची घुसखोरी; BSF जवानांनी दिलं सडेतोड उत्तर

4) फक्त बदाम खाणं पुरेसं नाही; स्मरणशक्ती वाढण्यासाठी करा सोपे 6 उपाय

5) इथं कराल हनीमून तर होईल घटस्फोट

6) अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

राज्य सरकारच्या वकिलांनी जामिनाला विरोध केला. मुलगी अल्पवयीन असून तिचे आणि मुलाचे वडील भाऊ असल्याचे प्राथमिक दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचिकाकर्त्याने आपले जीवन आणि स्वतंत्रतेसाठी मुलीसोबत फौजदारी याचिका दाखल केली असे तरुणाच्या वकिलांनी न्यायमुर्ती अरविंद सिंह सांगवान यांना सांगितले. 

मुलगी १७ वर्षाची असून दोघे लिव्ह इन रिेलेशनशीपमध्ये होते असे याचिकाकर्त्याने म्हटलंय. आपल्या आईवडीलांकडून त्रास होत असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. न्यायालयाने ७ डिसेंबरला याचिकेवर आपला निर्णय दिला. जर तरुण आणि मुलीला सुरक्षेबद्दल शंका असेल तर तात्काळ सुरक्षा देण्यात यावी असे न्यायालयाने म्हटलंय. पण हा आदेश याचिकाकर्त्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यापासून, कायदेशीर कारवाईतून वाचवणारा नाही असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.