coronavirus-aamir-khan

 करोना विषाणू (Corona virusचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आणि डॉक्टर्स मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. मात्र या सल्ल्याकडे आमिर खान (Aamir Khanने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपा नेता नंद किशोर गुर्जर (Nand Kishore Gurjar) यांनी आमिरविरोधात कोविडचा प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली आहे.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या गाजियाबादमध्ये आहे. यावेळी आमिरला भेटण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. आमिर देखील मोठ्या उत्साहाने आपल्या चाहत्यांशी संभाषण करत होता. परंतु यावेळी त्याने आपल्या तोंडावर मास्क किंवा फेसशिल्ड लावलं नव्हतं. परिणामी आमिरने कोविडचा प्रोटोकॉल मोडला आहे, असा आरोप नंद किशोर गुर्जर यांनी केला. लक्षवेधी बाब म्हणजे ते केवळ आरोप करुन शांत बसले नाहीत, तर त्यांनी आमिरविरोधात थेट पोलीस तक्रारही केली आहे.

Covid-19 : २४ तासांत ४६,९६३ नवीन रुग्ण

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तर सण-उत्सवानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात याचा प्रदुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशातील नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या आसपास गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.