coronavirus vaccine


कोरोना विषाणूची लस (coronavirus vaccine) येण्यास अवघे 3 – 4 महिने लागतील असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी गुरुवारी केला. पुढील वर्षी एप्रिल ते मे पर्यंत Covishield नावाची कोरोना विषाणूची लस भारतात उपलब्ध होईल असा दावा त्यांनी केला. यासह पूनावाला यांनी लसच्या संभाव्य किंमतीबद्दलही माहिती दिली.

पूनावाला म्हणाले की एप्रिल-मे मध्ये लस तयार होईल असा कुणीही विचार केला नव्हता. आतापर्यंत या लसीने वयोवृद्ध लोकांवरही चांगले परिणाम दिले आहेत. मॉर्डर्ना आणि फायझर महाग आहे आणि त्याची साठवण करणे कठीण आहे, या लसीमुळे आपण किती काळ सुरक्षित राहू शकतो हा देखील मोठा प्रश्न आहे.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?


आतापर्यंत त्यांचे निकाल खूप चांगले आहेत. पूनावाला म्हणाले की ही लस दीर्घकाळ तुमचे रक्षण करू शकते की नाही हे येणारी वेळ सांगेल. सध्या फक्त अंदाज आणि दावे केले जात आहेत.

सीरम इंस्टीट्यूटच्या प्रमुखांनी सांगितले की ब्रिटनमधील नियामकांकडून मंजुरी मिळताच आम्ही भारतात अप्लाय करू. प्रथम आपत्कालीन परिस्थितीसाठी ही लस वापरली जाईल. सामान्य लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी 3-4 महिने लागू शकतात.

पूनावाला म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी ही Covishield लस सुमारे 500-600 रुपयात उपल्बध करून देण्यात येईल. त्यांनी सांगितले की सरकार ही लस मोठ्या प्रमाणात खरेदी करेल, यामुळे ती कमी किंमतीत मिळेल. ते म्हणाले की आम्ही लवकरच दरमहा 100 दशलक्ष डोस तयार करू. आम्ही उत्पादन क्षमता वाढवित आहोत.

जुलैपर्यंत भारतात 30-40 करोड लस उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही गुरुवारी विश्वास व्यक्त केला की कोरोनाव्हायरस लस येत्या तीन-चार महिन्यांत तयार होईल आणि सरकारने लस देन्यासाठी काळजीपूर्वक प्राथमिक योजना तयार केली आहे ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि 65 वर्षापुढील वयोगटातील लोक या यादीत प्रथम क्रमांकावर असतील.