corona test


कोरोना (coronavirus) किटचा तुडवडा, संमतीसाठी पालकांचा निरुत्साह, कोरोनाचा प्रसार यांचा सामना करत सोमवारपासून (ता. 23) शाळा भरवण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यातील माध्यमिक शाळा (school) सज्ज झाल्या आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या घंटेसाठी तालुक्‍यातील सुमारे 36.66 टक्के शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीपासून दूर राहिल्यामुळे पहिल्याच दिवशी मुलांच्या तुलनेत शिक्षकांची गैरहजेरी असणार आहे. केवळ 14.97 टक्के शिक्षक शाळेत जाण्यासाठी पात्र ठरले आहेत. 

Must Read

1) मोठी बातमी! अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप...

2) चंद्रकांत पाटील यांचा भाजपाकडून तीव्र निषेध

3) एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू

4) १ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा 'हा' नियम

5) ...तर रोहितचं खेळणं कठीण, रवी शास्त्रींनी व्यक्त केली चिंता


सोमवारपासून (ता. 23) माध्यमिक शाळांना (school) मुहूर्त मिळाला आहे; मात्र शैक्षणिक स्टाफला कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने सोमवारपर्यंत कोरोना चाचणी होणे कठीण झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून 7 डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तयारी पूर्ण झालेल्या शाळाच पहिल्या घंटेसाठी सज्ज आहेत. संबंधित शाळेतील बहुतांश कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट निगेटिव्ह आला, अशा संस्थांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याची इच्छा दर्शवली आहे. 

हातकणंगले तालुक्‍यातील केवळ 525 शिक्षकांची (teacher) कोरोना चाचणी करण्यात आली आहे. संजय घोडावत विद्यापीठ, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, पारगाव या तीन ठिकाणी स्त्राव तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. किटचा तुटवडा असल्याने सोमवारपर्यंत कोरोना चाचणी (corona test) पूर्ण करणे कठीण बनले आहे. त्यामुळे ज्या शाळांची तयारी पूर्ण झाली आहे आणि ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे अशा शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागात मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती समाधानकारक आहे; मात्र शहरी भागात काही शाळांमध्ये वर्गातील पटसंख्येच्या तुलनेत दोन टक्केही पालकांची संमती नसल्याचे चित्र आहे. कोरोनात शैक्षणिक संस्थांचे शाळेच्या पहिल्या दिवसावर पुढचे दिवस अवलंबून असणार आहेत.