college-girl-drunk-herbicides

तरुणांनी काढलेली छेड सहन न झाल्याने नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणी तणनाशक (Antiperspirant) प्यायली. गेले आठ दिवस मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर शुक्रवारी (ता. ३०) संपुष्टात आली. आणि प्राजक्ताची आई निराधार झाली.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

तसा बाऊचकर कुटुंबीयांचा आज अखेरचा जीवन प्रवास खडतरच. ज्याच्या साथीने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, तो पतीच मुलगी पदरी सोडून अर्ध्यावर सोडून गेला. त्या धक्‍क्‍याने पाठोपाठ सासऱ्यांनीही इहलोकीची यात्रा संपविली. मुलगी प्राजक्तातच आयुष्याचा आधार शोधत अवघ्या अर्धा एकर शेती व गोळ्या-बिस्किटांच्या दुकानावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्या माऊलीचा आधारही प्राजक्ताच्या जाण्याने हिरावून नेला.

वैशाली यांचे पती सुरेश यांचा २०१२ मध्ये शेतात सर्पदंशाने मृत्यू झाला. मुलाच्या आकस्मिक जाण्याच्या धक्‍क्‍याने सासऱ्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे वैशाली पूर्णपणे निराधार झाल्या. त्या वेळी अवघ्या १२ वर्षांच्या प्राजक्तासाठी डोंगराएवढ्या दुःखातून सावरून दोन नणंदा व भावांच्या आधारावर जीवन कंठू लागल्या. एवढी हलाखीची स्थिती असतानाही त्यांनी प्राजक्ताच्या शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही. तिला सातवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण देऊन पुढील शिक्षणासाठी कोतोली येथे पाठविले.

प्राजक्तानेही आईच्या कष्टाचे चीज करीत एस.वाय.पर्यंत मजल मारली. २३ तारखेला प्राजक्ता पुढील शिक्षणाचा प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी कोतोलीला गेली असतानाच तिचा विनयभंग झाला. या विनयभंगाच्या नैराश्‍यातूनच प्राजक्ताने विषारी औषध प्राशन केले व त्यातच तिचा मृत्यू झाला. जर २३ तारखेला घडलेली विनयभंगाची घटना प्राजक्ताने आईला सांगितली असती तर प्राजक्तावर जीव गमावण्याची वेळ आली नसती व आईचा आधारही हरपला नसता. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, या घटनेची गावात दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे. पोलिसांसमोर या घटनेचे गूढ उकलण्याचे आव्हान आहे.
 

पोलिसांसमोर आव्हान

प्राजक्ताने घरी येऊन तणनाशक प्राशन केल्याचे सर्वांत आधी अजितलाच समजले. त्यानेच तिला स्वतःच्या दुचाकीवरून कोल्हापुरात उपचारांसाठी नेले; पण तिची प्रकृती गंभीर झाल्यावर अजितनेही विषारी औषधप्राशन केले. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.