cold-snap-kolhapur



 गतवर्षी डिसेंबर, जानेवारीपर्यंत वाट पाहायला लावलेल्या थंडीने यंदा मात्र ऑक्टोबर संपतानाच चाहूल दिली आहे. रात्रीचे तापमान १७ अंश सेल्सिअसवर खाली गेल्याने पहाटे काहीशी हुडहुडी भरू लागली आहे. नुकताच पावसाळा संपल्याने छत्र्या, रेनकोट कपाटात जाण्याआधीच अचानक आलेल्या थंडीने उबदार कपड्यांच्या घड्या कपाटाबाहेर डोकावू लागल्या आहेत.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी


साधारणपणे दिवाळीपासून खऱ्या अर्थाने थंडीचे आगमन होते; पण गेल्या वर्षी म्हणावी तशी थंडी पडलीच नाही. ऐन दिवाळीत पाऊस पडत होता. पावसाळा लांबत गेल्याने थंडीची तीव्रता जाणवलीच नव्हती. त्यानंतर मार्चमध्ये लगेच कडक उन्हास सुरुवात झाल्याने थंडीचा आनंद घेताच आला नाही. यावर्षी मात्र ऋतुचक्र रुळावर आले आहे. पावसाळा वेळेत संपला आणि पाठोपाठ लगेच थंडीही आली आहे.