chhattisgarh-assistant-commandant-nitin-bhalerao

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात (Sukma district)  नक्षलवाद्यांनी केलेल्या एका IED स्फोटात (IED) एक जवान शहीद झाले आहेत. ठरवून केलेल्या या विस्फोटात सीआरपीएफ कोबरा २०६ बटालियनचे ७ जवान जखमी देखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री IED स्फोटात एकूण ८ जवान जखमी झाले. या घटनेनंतर तात्काळ साऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव (Assistant Commandant Nitin Bhalerao)  यांचे निधन झाले. 

Must Read

1) राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

2) शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

3) 'भाजपमधून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येणार'

4) 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

5) अनैतिक संबंध तोडले म्हणून महिलेची अश्लील छायाचित्र मुलांना पाठवली

6) लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला

या स्फोटात शहीद झालेले नितीन भालेराव हे नाशिकमधील इंदिरानगरमध्ये राहणारे होते. ही घटना समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. असिस्टंट कमांडंट (Assistant Commandantअसलेले नितीन भालेराव या स्फोटात जबर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

या घटनेबाबत जिल्ह्यातील पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितलं की, सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला गावाजवळ विस्फोट ठेवण्यात आले होते. यामुळे केंद्रीय रिझर्व पोलीस दलातील सीआरपीएफचे कोबरा बटालियनची अनेक जवान जखी झाले आहे. सीआरपीएफच्या २०६ कोबरा बटालियनच्या जवानांना पेट्रोलिंग करता या क्षेत्रात रवाना करण्यात आलं होतं. या पेट्रोलिंग दरम्यान नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.