changes-schedule-special-trains-1-december

मध्य रेल्वे मार्गावर (Central railway lineलॉकदौंनानंतर सुरू करण्यात आलेल्या सुमारे 12 विशेष गाड्यांच्या वेळापत्रकासह थांब्यानमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 डिसेंबर पासून प्रवाशांना बदललेल्या वेळेतच या विशेष गाड्यांने प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळांच्या  माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान या विशेष गाड्यांमध्ये केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची  परवानगी असेल, त्याशिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19 (Covid-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

- मुंबई-कोल्हापूर विशेष
01029 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळ 8.40 वाजता सुटेल आणि  कोल्हापूरला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.

01030 विशेष गाडी कोल्हापूर येथून दररोज सकाळी 8.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी रात्री 8.5  वाजता पोहोचेल.

- मुंबई-सोलापूर विशेष

02115 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज रात्री 10.45 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचेल.

02116 विशेष गाडी  सोलापूर येथून दररोज रात्री 10.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.35 वाजता पोहोचेल.

- मुंबई - पुणे विशेष
02015 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी 5.40 वाजता सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी सकाळी 9.5 वाजता  पोहोचेल.

02016 विशेष गाडी पुणे येथून दररोज 6.35  वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.

- मुंबई - पुणे विशेष
02123 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी 5.10 वाजता सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता पोहोचेल.

02124 विशेष गाडी पुण्याहून दररोज सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी सकाळी 10.25 वाजता पोहोचेल

- मुंबई - लातूर विशेष

02207 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 9 वाजता सुटेल आणि लातूरला दुसर्‍या दिवशी सकाळी 6.30 वाजता  पोहोचेल. 

02208 विशेष गाडी लातूर येथून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7.55 वाजता पोहोचेल.

- मुंबई - मनमाड विशेष
02109 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी रात्री 10.50 वाजता पोहोचेल.

02110 विशेष गाडी मनमाड येथून दररोज सकाळी 6.2 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

- मुंबई-नागपूर विशेष

02189 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज रात्री 8.15 वाजता सुटेल आणि नागपूरला दुसर्‍या दिवशी सकाळी 7.20 वाजता पोहोचेल. 

02190 विशेष गाडी नागपूरहून दररोज रात्री 8.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 8.5 वाजता पोहोचेल.

- पुणे- नागपूर विशेष सुपरफास्ट

02041 सुपरफास्ट विशेष गाडी दर गुरुवारी पुणे येथून रात्री 10 वाजता  सुटेल आणि नागपूरला दुसर्‍या दिवशी दुपारी 1.10  वाजता पोहोचेल.
 
02042 सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.25  वाजता पोहोचेल.

- पुणे - अजनी विशेष

02239 विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून रात्री 10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता अजनीला पोहोचेल.

02240 विशेष गाडी दर रविवारी अजनीहून रात्री 7.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 11।5 वाजता  पोहोचेल.

- पुणे - अमरावती विशेष

02117 विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून दुपारी 3.15  वाजता सुटेल आणि अमरावतीला दुसर्‍या दिवशी दुपारी 2.55 वाजता  पोहोचेल.

02118 विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून रात्री 6.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 7।20 वाजता  पोहोचेल.

-  पुणे - अजनी विशेष

02223 विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून दुपारी 43.15 वाजता सुटेल आणि अजनीला दुसर्‍या दिवशी सकाळी 4.50 वाजता पोहोचेल.

02224 विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून 7.50  वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 11.35  वाजता  पोहोचेल.  

मुंबई-आदिलाबाद विशेष

01141 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल. 

01142 विशेष गाडी आदिलाबाद येथून दररोज दुपारी 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 5.35 वाजता पोहोचेल.