breast cancer


ब्रेस्ट कॅन्सर (breast cancer) हा 40  ते 60 वयोगटात पाहायला मिळतो. मात्र आता तरुण मुलींमध्येही हा धोका वाढत चालला आहे. जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणं, स्तनपानाचा अभाव, वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कॅन्सरतज्ज्ञ तसंच तपासणीसाठी सोयीसुविधांचा अभाव या गोष्टी महिलांमधील वाढत्या ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत आहेत.

स्तन कर्करोगाचा (breast cancer) निदान आणि वेळेवर उपचार करणं तसंच त्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं ही काळाची गरज आहे.  स्तनाच्या कर्करोगाचं वेळीच निदान आणि यशस्वी उपचारांसाठी डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासणी आणि मॅमोग्राफी तसंच सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

दरमहिन्याला सर्वच महिलांनी किमान 10 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. मासिक पाळीच्या (periods) सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल, असं मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या कन्सल्टंट ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. रेश्मा पालेप यांनी सांगितलं.

आपलं संपूर्ण स्तन आणि बगलेचं परीक्षण केले पाहिजे. आपल्या स्तनाचं स्वत: परीक्षण करण्याचे काही मार्ग आहेत.अंघोळ करताना गोलाकार पद्धतीनं आपला डावा हात आपल्या उजव्या स्तनावर फिरवा. एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी सपर्क साधा.

दुसरं म्हणजे आरशासमोर उभं राहून स्तनातील गुठळ्या, सूज येणं, त्वचा निस्तेज दिसणं आणि स्तनाग्र बदलणं यासारख्या बदलांचं परीक्षण करा. यामुळे स्तनाचा कर्करोग ओळखला जाऊ शकतो.ब्रेस्ट किंवा निपल्समध्ये कोणतेही असामान्य बदल दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे बदल ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं.