cait-report-says-72000-crore-sales-on-diwali

कोरोना संकटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल' (Vocal For Local) असे आवाहन केले आहे. विशेषत: दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींनी स्थानिक नागरिकांकडून वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. आता पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर लोकांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला. विशेषत: या दिवाळीत चीनला व्यावसायिक आघाडीवर मोठा धक्का बसला आहे.

दिवाळीच्या दिवशी लोकांनी चिनी वस्तूंवर जोरदार बहिष्कार (Disfellowshipघातला. व्यापार्‍यांची संघनटा असलेल्या कॅटच्या मते, दिवाळीत चीनला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. या उत्सवाच्या हंगामात लोक चिनी उत्पादनांकडे दुर्लक्ष करताना दिसले.

कॅटच्या नेतृत्वात देशभरातील व्यावसायिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि आत्मनिर्भर भारत या आवाहनाची जोरदारपणे अंमलबजावणी केली. दिवाळीच्या दिवशी खरेदी-विक्रीसाठी लोकांनी चिनी उत्पादनास विरोध केला.

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती दिली की, दिवाळीच्या काळात देशातील 20 वेगवेगळ्या शहरांमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सुमारे 72 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात चीनला सुमारे 40 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले.

कॅट या व्यवसाय संस्थेच्या म्हणण्यानुसार भारतात तयार केलेले एफएमसीजी उत्पादने, ग्राहक वस्तू, खेळणी, विद्युत उपकरणे व इतर वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, भेट वस्तू, मिठाई, स्नॅक्स, घरातील सामान, भांडी, सोनं व दागिने, शूज, घड्याळे, फर्निचर, कपडे, घराची सजावट मातीच्या दिव्यांसह दिवाळी पूजेच्या वस्तू, वस्तूंची विक्री चांगली झाली.