gold silver rategold silver rate- धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति दहा ग्रॅम) ५५,००० रुपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जर सोने खरेदी करण्याचा विचार तुम्ही करीत असाल, तर बाजारभावापेक्षा कमी भावाने सोने खरेदी करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील ही आठवी मालिका असून, गुंतवणुकीसाठी आज शेवटची मुदत आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. (gold silver rate)

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

इच्छुक गुंतवणूकदारांना स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून हे रोखे खरेदी करता येतील. तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत पोस्ट कार्यालयांतूनही हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. याखेरीज राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येईल.

सुवर्णरोख्यांचा कालावधी आठ वर्षांचा असून, कालावधी पूर्ण होण्याआधी या रोख्यांची विक्री करायची झाल्यास ती कालावधीच्या पाचव्या वर्षापासून करता येईल. किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये, तर कमाल गुंतवणूक चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये करता येईल. सरकार या रोख्यांवर २.५ टक्के व्याज देणार आहे. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.