bollywood-actor-amit-sadh-on-sushant-singh-rajputs

अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant singh rajput) यानं आत्महत्या करुन जीवन संपवण्याच्या घटनेला आता काही महिने उलटले. पण, तरीही काही कारणांनी सुशांतच्या आठवणींना आणि या घटनेला चालना मिळतेच. सध्या असाच एक भलता योगायोग घडला आणि सुशांतसह स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्यानं याचा संदर्भ घेत एक लक्षवेळी वक्तव्य केलं. 

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

अचानकच आली सुशांतची आठवण....

आपल्यासोबत घडलेल्या एका योगायोगाबाबत बोलताना अमित म्हणाला, 'हल्लीच कुल्लूहून मुंबईत येतेवेळी माझ्या तिकीटावर अनुक्रमांक SSR असा होता. मी त्यावेळी लगेच यावर लक्ष दिलं नाही. पण, नंतर माझ्या लक्षात आलं की हा क्रमांक मलाच मिळाला होता. मला असं वाटतं की, कोरोनानंतर कलाविश्व बदललं आहे आणि त्याच्या (सुशांतच्या) निधनामुळं ते प्रभावित झालं आहे. मला वाटतं की आम्ही यामुळं प्रभावित झालो आहोत. जर तसं नसेल तर आम्ही मनुष्यच नाही आणि जर आम्ही एक मनुष्यच नाहीतर आम्हाला त्यांच्यासंबंधीच्या गोष्टीही सांगितल्या जाऊ नयेत'.अमितसोबत घडलेला हा प्रसंग योगायोग होता किंवा आणखी काही. पण, त्यानिमित्तानं सुशांतची आठवण त्याला झाली. 

अभिनेता अमित सध (Amit Sadhयानं सुशांत सिंह राजपूतसह 'काय पो चे' या चित्रपटातून स्क्रीन शेअर केली होती. मुख्य म्हणजे या दोघांच्याही बॉलिवूड कारकिर्दीसाठी हा चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिका बजावून गेला.