sridevi-makes-madhuri-dhak-dhak-girl

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावे एखादा टॅग जोडला जातो. सांगायचंच झालं तर, ज्याप्रमाणे शाहरुख खानला ‘बादशाह खान’ किंवा सलमानला ‘दबंग खान’ असं म्हटलं जातं अगदी त्याचप्रमाणे माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. १९९० मध्ये आलेल्या ‘बेटा’ चित्रपटातील या गाण्याने माधुरीचं नशीब पालटलं होतं. पण तुम्हाला माहितीये का, आजही माधुरीची ओळख असलेल्या या गाण्यासाठी माधुरी दीक्षित पहिली पसंत नव्हती.

इंद्रकुमार यांनी ‘बेटा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी प्रेक्षकांनी अनिल कपूर – श्रीदेवी जोडीला डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे प्रसिद्ध असणारी अनिल कपूर – श्रीदेवी जोडी आपल्याही चित्रपटात असावी अशी इंद्रकुमार यांची इच्छा होती. दोघांची जोडी असली की चित्रपट हिट होण्याची १०० टक्के शाश्वती असायची. पण श्रीदेवीने मात्र या चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. अनिल कपूरसोबत खूप चित्रपट करत असल्याचं कारण देत त्यांनी हा चित्रपट नाकारला होता.

Must Read

1) Breaking: वीज बिलांबाबत मोठी अपडेट

2) 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी महत्वाची बातमी

3) 2021 मध्ये परिस्थिती बिघडणार; कोरोनाबरोबरच या महासाथीसाठी दिला इशारा

4) 'विराट कोहली हा तर अनुष्काचा पाळीव प्राणी'

5) Good News, कोरोना रुग्णांची संख्या 7 महिन्यात सर्वात कमी

6) IPL मध्ये पुढच्या वर्षी जोडली जाणार या शहराची टीम?

इंद्रकुमार यांनी अनेक प्रयत्न करुनही श्रीदेवी यांचं मन वळलं नाही. शेवटी इंद्रकुमार यांनी दुसऱ्या अभिनेत्रीसाठी शोध घेण्यास सुरुवात केली आणि माधुरी दीक्षितची निवड झाली. माधुरी त्यावेळी इंडस्ट्रीत नवी होती. माधुरीने इंद्रकुमार यांची ऑफर स्वीकारली. ‘बेटा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि यासोबतच माधुरीचं ‘धक धक’ गाणंही सुपरहिट ठरलं.

हे गाणं अत्यंत बोल्ड असल्याचं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं. सेन्सॉर बोर्डानेही गाण्यावर आक्षेप घेतला होता. गाणं शूट करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ ठेवण्यात आला होता, पण फक्त तीन दिवसांत गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं.

विशेष म्हणजे ‘धक धक’ गाण्यात श्रीदेवी नसली तर गाण्यासोबत त्यांचं कनेक्शन आहे. कारण गाणं शूट करण्याआधी माधुरीने खूप वेळा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘काटे नहीं कटते’ गाणं पाहिलं होतं. यानंतर सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं. माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.