Safe-Tourist-Center

जागतिक दर्जाच्या साधनसुविधांसह गोवा हे जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन केंद्र (Tourist centerबनविणे व त्यायोगे सर्वात प्रतिष्ठित, उच्चभ्रू पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्याचे लक्ष्य गोवा पर्यटन धोरणात ठेवण्यात आले आहे.

पर्यटन खात्यातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गोवा (goa)पर्यटन धोरणात तसा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. प्रतिष्ठित, दर्जेदार पर्यटक गोव्यात यावे यासाठी सर्व आवश्यक साधनसुविधा उभारण्यावर आता भर देण्यात येणार आहे. 2024 पर्यंत या साधनसुविधा पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय विविध कल्पक, आकर्षक जाहिराती तसेच अन्य माध्यमांद्वारे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणे व 2030 पर्यंत गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी जागतिक दर्जाचे केंद्र बनविणे असा दृष्टीकोनही या धोरणात ठेवण्यात आला आहे.

Must Read

1) भाजपवर सदाभाऊ खोत नाराज, चंद्रकांत पाटलांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
2) राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण
3) दोन देशांसह पुण्यातून झाल्या 3 महत्त्वाच्या घोषणा
4) धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?
5)केंद्र सरकार मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये भरणार?
6) CCTV VIDEO : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर

आगामी 25 वर्षात पर्यटनदृष्टय़ा राज्याचा विकास कसा करायचा यावरही धोरणात भर देण्यात आला असून गेल्या महिन्यातच या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.

पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी 11 टक्के वाढ

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील 40 टक्के लोक पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. वर्ष 2005 मध्ये राज्यात 2.3 दशलक्ष पर्यटक आले. 2017 पर्यंत ती संख्या वाढून 7.8 दशलक्षांपर्यंत पोहोचली. ही वाढ वार्षिक सरासरी 11 टक्के एवढी असून त्यात सुमारे 89 टक्के देशी पर्यटकांचे योगदान आहे. असे पर्यटन संचालक मिनीनो डिसोझा यांनी अधिसूचित केलेल्या धोरणात म्हटले आहे.

राज्यातील पर्यटन स्थळांचा सर्वांगिण विकास व वापर करता यावा या उद्देशाने 2016 मध्ये सरकारने राज्याचा पर्यटन मास्टरप्लॅन विकसित केला होता. त्यानंतर गतवर्षी गोवा पर्यटन धोरण 2019 तयार करण्यात आले होते.