aashiqui-actor-rahul-roy-hospitalized-due-to-brain-stroke

(Bollywood News) 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला (Rahul Royब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र अचानकच सेटवर त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तात्काळ मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ५२ वर्षीय राहुलला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

दोन दिवसांपूर्वीच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. १९९० साली रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'आशिकी' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश भट्ट यांच्या 'आशिकी'  (Bollywood News) चित्रपटामध्ये उल्लेखनिय काम केल्यानंतर 'सपने साजन के', 'फिर तेरी कहानी याद आई', 'जनम', 'प्यार का साया', 'जुनून', 'पहला नशा', 'गुमराह' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका  बजावल्या आहेत.