relationship-student-teacher-love

तसं मी कधी कॉलेजमध्ये फार लेक्चर अटेंड (Lecture attendeeकरत नाही. पण तिचा तास कधी बुडवत नाही. अगदी एखाद्या हुश्शार आणि शहाण्या विद्यार्थ्यासारखा तिच्या लेक्चरला मी सर्वांच्या आधी हजर असतो. तिनं वर्गात पाऊल ठेवताच मनाची धडधड वाढते. तिचे ते पाठीवर रेंगाळणारे काळेभोर केस, खांद्यावर बॅग, बेंबीच्या खाली नेसलेली साडी, ती शिकवताना हलणारे तिचे गुलाबी ओठ, मध्येच एखादं जोक मारून तिचं गोड हसणं आणि त्यावेळी तिच्या गालावर पडणारी खळी. कॉलेजची एकही तरुणी तिची बरोबरी करू शकत नाही. वयाची तिशी ओलांडली तरी कॉलेज तरुणींनाही लाजवेल असं तिचं सौंदर्य. माझ्या प्रिय सुमन मॅडम. MY LOVE.

माझ्या वयाच्या कॉलेज (College) तरुणींमध्ये मला कधी फारसा रस वाटलाच नाही. तरुणींपेक्षा मला सुमन मॅडमच खूप आवडू लागल्या. आमच्या अकाऊंटच्या शिक्षिका. तसा अकाऊंटचा आणि माझा छत्तीसचा आकडा. पण सुमन मॅडमसाठी मी त्याच्याशीही दोस्ती केली. कारण सुमन मॅडम अकाऊंट न येणाऱ्या विद्यार्थ्याला वैयक्तिरित्या शिकवायच्या. त्यानिमित्तानं का होईना मला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवता येईल. मी दररोज त्यांच्याकडे काही ना काही प्रश्न घेऊन जायचो. त्यामुळे मला त्या चांगलंच ओळखू लागल्या. हळूहळू आमचं खूप छान बॉंडिंग जमलं. माझी अकाऊंट शिकण्याची ओढ पाहून त्या मला अकाऊंट शिकण्यासाठी त्यांच्या घरीही बोलावू लागल्या.

Must Read

1) राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

2) शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

3) 'भाजपमधून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येणार'

4) 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल

5) अनैतिक संबंध तोडले म्हणून महिलेची अश्लील छायाचित्र मुलांना पाठवली

6) लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला


त्यांचं लग्न झालं नव्हतं. आई-वडील नागपुरात आणि त्या पुण्यात एकट्याच राहायच्या. सोबत मदतीला एक मोलकरीण होती पण ती आपलं काम करून निघून जायची. मग काय आम्ही दोघंच. त्या शिकवत असताना मी एकटक त्यांच्याकडेच पाहत असायचो. शिकवता शिकवता त्यांचा स्पर्श मला व्हायचा तेव्हा जोर का झटका लागायचा. तो स्पर्श हवाहवासा वाटायचा. त्यांनीदेखील हे नोटीस केलं होतं, पण पाहून न पाहिल्यासारखं केलं. त्यावेळी त्यांचं गालातल्या गालात हसणं मात्र माझ्या नजरेतून चुकलं नाही. त्या मला स्पष्टपणे सांगणार नाहीत पण मला माहिती आहे मीसुद्धा त्यांना खूप आवडतो. मी जसं त्यांच्यावर प्रेम करतो ना, तसंच त्याही माझ्यावर करतात. नाहीतर उगीच का त्या गालातल्या गालात हसतात, मी त्यांच्याकडे एकटक पाहतो तरी त्या मला ओरडत नाही. हे त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम नाही तर आणखी काय आहे?

समीरप्रमाणेच तुम्हीदेखील विसाव्या वयात तुमच्या तिशीपार टिचरच्या प्रेमात पडलात का? तिचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटतो आहे, तिला जे आवडतं ते तुम्ही करत आहात आणि तिच्याकडूनही तुम्हाला तसे सिग्नल मिळत आहेत. पण रिलेशनशिप पुढे न्यावी की नाही असा प्रश्न तुम्हाला पडला आहे.

Redwomb वरील Sexual wellness columnist पूजा प्रियंवदा यांनी सांगितलं, "ज्यावेळी बालवयातून आपण किशोरवयात आणि त्यानंतर तारुण्यात पदार्पण करतो, त्यावेळी 2 माणसांमधील नातं हे लैंगिक आकर्षण आणि प्रेमाची भावना यावरच तयार होतं. अशावेळी कोणतीही गोष्ट करण्यासाठी योग्य वयाची आणि प्रौढ होण्याचीही प्रतीक्षा करवत नाही. अशी एखादी व्यक्ती ज्याची खूप प्रशंसा होते, त्याचं अनुकरण आपण करतो. आपणही त्याच्यासारखं व्हावं असं आपल्याला वाटतं. एक आदर्श जोडीदार म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतो. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास शाळेतील एखादा शिक्षक किंवा शिक्षिका आपल्याला खूप आवडणं. हे आकर्षण खरंतर एकतर्फीच असतं"

"कमी वयात असलेलं आकर्षण खरं प्रेम असेलच असं नाही. कारण प्रेमासाठी संयम आणि लक्ष या दोन गोष्टी खूप आवश्यक असतात आणि या वयात या दोन्ही गोष्टी क्वचितच असतात. फक्त 4 महिन्यांपर्यंत तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ते फक्त आकर्षण असतं, मात्र त्या व्यक्तीप्रती तुमच्या भावना त्यानंतरही तशाच कायम राहिल्या, तर ते खरं प्रेम असू शकतं.  पुढे जाऊन हे आकर्षण खऱ्या प्रेमात बदलूही शकतं. तोपर्यंत संमती आणि सुरक्षा या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रेम करत राहा", असं प्रियंवदा म्हणाल्या.