chandrakant-patil-retaliated-jayant-patil

'जयंत पाटील (Jayant Patilयांनी आमची काळजी करू नये. त्यांना जे फुकटात मिळाले आहे, आधी ते पचवावे आणि नंतरच आम्हाला सल्ले द्यावेत,' असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patilयांनी जयंत पाटील यांच्यावर केला. महाविकास आघाडीचे सरकार हे नवीन काहीच करीत नाही, केवळ जुने जे निर्णय घेतले आहेत, ते रद्द करण्याचे काम करीत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असा दावा भाजप करीत असले, तरी राज्य सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढील चार वर्ष भाजपला सरकार पडेल, अशी स्वप्नच बघावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी भाजपवर केली होती. 


Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत


पुणे पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी असा पलटवार केला. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे निवडणूक प्रमुख राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता पाटील म्हणाले, "राऊत यांना सल्ला देण्यासाठी खरंतर दिल्लीत पाठवले पाहिजे. अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती.'' विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत होते. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पदवीधर सारखे निवडणुकीत आणि पाच जिल्ह्यात फिरवावे हे काय योग्य वाटत नाही. त्यांना आम्ही मोठी जबाबदारी देणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाल्यानंतर ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या संग्राम देशमुख यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले.