Prasad-Lad-Corona-Positive

एकनाथ खडसेंनंतर (Eknath Khadseआता भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Ladयांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे रिकव्हरी रेट जरी वाढत असला तरी कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण अद्याप म्हणावं तेवढं कमी झालेलं नाही. भाजप आमदार प्रसाद लाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरू असल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनी स्वत: दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.'

Must Read

1) उद्यापासून कर्फ्यू; महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown?
2) 2030 पासून पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी
3) लवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या GOOD NEWS!
4) विराट नसताना रहाणेला कर्णधार केलं तर... पॉण्टिंगने दिला धोक्याचा इशारा
5) शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत love..Sex आणि धोका

राज्यात महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी होत होती. दररोज नव्या रुग्णांची संख्या ही 3 हजारांच्या आसपास तर मृत्यू संख्या ही 100च्याही खाली आली होती. मात्र दिवाळीनंतर आता त्यात वाढ होत असल्याचं आढळून येत आहे. राज्यातल्या इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गुरुवारी 5,535 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 5,860 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 154 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 17,63,055 वर गेलीय तर एकूण 16,35,971 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात आत्तापर्यंत 46,356 जणांचा मृत्यू झाला आहे.