katrina-kaif-shared-bikini-photo-social-media

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaifसोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच कॅटने तिचा बिचवरील व्हाईट बिकिनीमधली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘पॅराडाइज’. फॅन्सना तिचा हा खूप आवडला आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होतो आहे.  अलीकडेच कतरिना एका शूटिंगसाठी मालदीवला गेली होती. 

रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) बरोबर कतरिना दिसणार आहे. हा सिनेमा मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात  आली.

कतरिना कैफला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुमारे 15 वर्षे झाली आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक हिट सिनेमा केले आहेत. कतरिना कैफने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख मिळविली आहे तसेच फॅशन स्टायलचेही कौतुक केले जाते.

 कतरिना कैफ शेवटची सलमान खानच्या भारत  चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोव्हरसुद्धा मुख्य भूमिकेत होते. लवकरच ती ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत  'फोन भूत'मध्ये दिसणार आहे.