district-533-new-corona-patients

पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५३३ नवे कोरोना (corona) रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २१७ जण आहेत. याशिवाय ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ५७३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिवसभरात ‌१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २९ हजार ४९० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ११ हजार ८१७ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३७७ रुग्णांचा समावेश आहे.

Must Read

1) भाजपसाठी निवडणूक झाली अवघड?

2) शिवसेनेसाठी धोक्याची घंटा?

3) 2020मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द माहितीये?

4) भाजप आमदाराची महिला नगरसेविकेला धक्काबुक्की, VIDEO

5) रोहित शर्मा नाही 'हा' आहे मुंबई इंडियन्सचा खरा मास्टरमाईंड

6) विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे भडकले चाहते

बुधवारी दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये १२५ , जिल्हा परिषद क्षेत्रात १४७, नगरपालिका क्षेत्रात ४० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील आठजण आहेत. पिंपरी-चिंचवड २ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५ आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट क्षेत्रातील एकाही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.१०) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.