thumb-pain-know-how-to-use

नित्यक्रमाची कोणतीही कामं हाताशिवाय करणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत हाताला दुखापत झाल्यामुळे कोणतीही कामं करणं अवघड होतं. विशेषतः कोणत्याही प्रकारचं कार्य करण्यासाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर केला जातो. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, जर अंगठ्याला Thumbs upदुखापत झाली असेल तर कोणतंही काम करणं खूप वेदनादायक होतं. अंगठ्याच्या वेदनेपासून मुक्तता मिळण्यासाठी घरच्या घरी अनेक उपाय करता येतात. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइल स्नायूंच्या वेदनांसाठी उपयोगी आहे. अंगठा आणि बोटांमध्ये मसाज केल्यानं सूज आणि वेदना दूर होते. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, ते हाडं आणि स्नायूंसाठी फायदेशीर आहेत. 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या आणि अंगठाच्या वेदनादायक भागावर 5 ते 10 मिनिटांसाठी मालिश करा. याव्यतिरिक्त ऑलिव्ह ऑईलमध्ये मिंट तेल मिसळूनही याची मालिश केली जाऊ शकते.

शेक

डॉ. केएम नाधीर यांच्या म्हणण्यानुसार, शेक दिल्यानं अंगठ्याच्या वेदना दूर होतात. यासाठी स्टोव्हवर एक तवा गरम करा आणि त्यावर सूती कपडा ठेवा आणि त्यास अंगठ्याच्या सभोवतालच्या वेदनादायक ठिकाणी 15 ते 20 मिनिटे शेका. जर जास्त वेदना होत असतील तर आपण हा उपाय दिवसातून 3-4 वेळा करू शकता. गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं कोणत्याही प्रकारच्या वेदना दूर होतात किंवा थोड्या वेळासाठी हात गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास देखील वेदना कमी होतील.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी


हळद

हळदीमध्ये बऱ्याच प्रमाणात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि जंतू नाशक गुणधर्म असतात, जे दाह आणि वेदना कमी करण्यात मदत करतात. हळद ही बर्‍याच अँटी-ऑक्सिडंट घटकांमध्ये समृद्ध आहे, त्यामुळे हळद अंगठ्याच्या वेदनांसाठी एक प्रभावी औषध मानली जाऊ शकते. 2 चमचे हळद कोमट पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि तयार मिश्रण अंगठ्यावर लावा आणि अंगठा पट्टीने बांधून ठेवा. दुसर्‍या दिवशी ही पट्टी सोडा. वेदना कमी होईपर्यंत किंवा आठवडाभर ही प्रक्रिया पुन्हा करा.

खडं मीठ

अख्खं किंवा खडे मीठ यामध्ये वेदना, जळजळ आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म आहेत.  यात मॅग्नेशियम आणि सल्फेटसारखे समृद्ध घटक असतात जे हाडे आणि स्नायूंसाठी फायदेशीर असतात. अंगठ्याचा त्रास कमी करण्यासाठी एक बादली पाण्यात अर्धा कप अख्खं मीठ घाला. आता या बादलीत आपले हात 15 मिनटं ठेवा. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी वापरू शकता आणि तुम्ही अर्धा कपऐवजी एक कप मीठ देखील घेऊ शकता. दिवसातून 2 वेळा या कृतीचे अनुसरण करा आणि आपण सकाळ आणि संध्याकाळ या पाण्याने अंघोळ देखील करू शकता.