politics of maharashtra- शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही अशा शब्दांत संजय राऊत (sanjay raut) यांनी कारवाईवर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती? अशी विचारणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

Must Read

1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव

“प्रताप सरनाईक घरी नसताना धाड टाकण्यात कसली मर्दानगी असं म्हणणाऱ्या संजय राऊत (sanjay raut) यांनी विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?,” असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. (politics of maharashtra)

“ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी. पण आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे. “प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.