bjp-lead-on-all-8-seats

 

बिहार, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशसह ११ राज्यांतील 58 विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही आज येणार आहेत. मतमोजणी सुरु आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) ला मोठं यश मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे.

Must Read

1) भिडे गुरूजींचा निशाणा

2) एकनाथ खडसे संतापले, म्हणाले...

3) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

4) मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच...

5) कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला

मध्य प्रदेशात 28, गुजरातमध्ये 8, उत्तर प्रदेशात 7, मणिपूरमध्ये 4, तर कर्नाटक, ओडिशा, झारखंड आणि नागालँडमध्ये प्रत्येकी दोन जागा आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या.

या राज्यांपैकी गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे निकाल भाजपसाठी फार महत्वाचे आहेत. मध्य प्रदेशातील 28 विधानसभा जागांच्या निकाला भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये भाजपने आपली जादू कायम ठेवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगींची लोकप्रियता कायम असल्याचं दिसत आहे.ृ

गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व

उत्तर प्रदेशात भाजप चार जागांवर आघाडीवर आहे, समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. झारखंडमधील दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये तर संपूर्ण 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

मध्य प्रदेशातही भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर शिवराज सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, 'जर दिग्विजय सिंह ईव्हीएमवर प्रश्न विचारत असतील तर याचा अर्थ असा की भाजप जिंकत आहे.'