#BiggBoss14entertainment center- कलर्सवरील रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' वादात सापडलेला आहे. यावेळी 'बिग बॉस' (#BiggBoss14 )वर लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्याचा आरोप करणी सेनेने केला आहे.  एजाज खानने पवित्र पुनिया दिलेल्या किसवर करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. 

त्यानंतर त्यांनी कलर्सला एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये या शो ला  सेन्सॉर किंवा बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, जर या शोवर सेन्सॉर किंवा बंदी घातली नाही तर करणी सेना आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल.

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट


बिग बॉसविषयी (#BiggBoss14 ) माहिती देणाऱ्या 'बिग बॉस तक' ह्या फॅन पेजने करणी सेनेचे एक पत्रही ट्विट केले होते, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, 'बिग बॉस खूप खालच्या दर्जाचा शो आहे. जो भारताय संस्कृतीचे नुकसान करीत आहे. याशिवाय हा शोमध्ये लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. एजाज खान पवित्रचे किस घेताना दिसला होता. हा शो अश्‍लीलता पसरवतो आहे आणि लव्ह-जिहादला प्रोत्साहन देत आहे, जे कोणत्याही प्रकारे स्वीकार केले जाणार नाही.  


'बिग बॉस' वर बंदी घालावी अशी आमची कलर्स चॅनलकडून मागणी आहे.  त्यावर सेन्सॉर किंवा बंदी घातली नाही तर करणी सेना आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. लव्ह-जिहादला प्रोत्साहन देणारी मालिका त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी करणी सेनेची आहे.(entertainment center)'बिग बॉस १४' शो सुरु झाल्यापासून कोणत्याना कोणत्या कारणामुळे वादात सापडतो आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने हा कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली होती.  जान कुमार शानूने मराठी भाषेबद्दल चुकीचे भाष्य केले होते त्यानंतर शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत हा कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली होती.  मात्र, शिवसेनेच्या  धमकीनंतर कलर्स आणि जान दोघांनीही माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा पडला.