Aishwarya rai and jaya bachchanbollywood gossip- अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya rai)यांना बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी हे जोडपं अभिनेत्री जया बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ऐश्वर्याची तोंड भरुन स्तुती करताना दिसत आहेत. जया बच्चन यांनी केलेलं कौतुक ऐकून ऐश्वर्याचे डोळे पाणावले.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

२००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांनी पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याची स्तुती केली. “एक खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे, जी नितीमूल्यांचा विचार करते, आदराने वागते आणि खूप सुंदर हसते, अशा मुलीची मी सासू होणार आहे. माझ्या कुटुंबात तुझं स्वागत करते, आय लव्ह यू”, असं जया बच्चन म्हणाल्या. हे ऐकताना भावूक झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.(bollywood gossip)‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही त्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं होतं. “ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचंच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे,” असं त्या म्हणाल्या होत्या.