be-smart-when-buying-gold

जर तुम्ही या दिवाळीत (Diwali 2020) सोने खरेदीसाठी (Gold) जाणार असाल तर तुम्हाला घडणावळीचे ((Making Charges)) दर माहित असणे आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत ही मूळ सोन्याच्या किमतीपेक्षा बरीच जास्त असते. ज्वेलर्स किंवा सराफा व्यावसायिक दागिन्यांचे जे दर लावतात, त्यात घडणावळीचे दरही जोडलेले असतात. त्यामुळेच प्रत्येक दागिन्याची किंमत वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळी असू शकते. घडणावळ किती धरली जाते, हे सराफा दुकानदार आणि तुम्ही घेत असलेल्या दागिन्यांवर अवलंबून असते.

काय असते घडणावळ आणि घट ?

वेगवेगळ्या सराफा दुकानांमध्ये घडणावळीचे दर वेगवेगळे असतात. साधारणपणे मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये घडणावळ म्हणजेच मेकिंग चार्जेसचे दर इतर लहान सराफा दुकानांपेक्षा जास्त असतात. ही घडणावळीची रक्कम वेस्टेज म्हणूनही ओळखली जाते. पुन्हा तुम्ही हा दागिना विकायला गेलात, तर त्यावेळी दागिन्याच्या किमतीत  ही घडणावळीची रक्कम सराफा दुकानदार गृहित धरत नाहीत. सोन्याच्या दागिन्यावर ३ टक्के जीएसटी (Goods and Services Tax) आकारण्यापूर्वी शेवटच्या टप्प्यात ही घडणावळीची रक्कम दागिन्याच्या किमतीत जोडली जाते. तसेच तुम्ही परिधान केलेले दागिने तुम्ही पुन्हा विकाला गेलात, तर त्याचे वजन करुन, सोन्यातील घटही मोजले जाते. यामुळे सोन्याच्या विक्रीच्या वेळी त्याची किंमत घट धरल्यास तुलनेने कमी येते.

Must Read

1) मंदिरं उघडण्याच्या निर्णयावर काँगेस नेत्याचा सवाल

2) दिवाळीनिमित्त भारताला मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

3) शिर्डीतील साईमंदिर भाविकांसाठी खुलं, मात्र...

4) ऑस्ट्रेलियाचे माईंड गेम सुरू, स्मिथचा टीम इंडियाला इशारा

5) KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'

6) पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की...

उदाहरणार्थ तुम्ही 10 ग्रॅम सोन्याच्या चैनची किंमत 50 हजार इतकी असेल तर सराफा दुकानदाराकडून त्यात घडणावळ 5 टक्के लावली जाते, त्यामुळे सोन्याच्या चेनची किंमत 55 हजार होते, त्यानंतर पुन्हा या रकमेवर जीएसटी आकरण्यात येतो. काही ठिकाणी सोन्याच्या प्रति ग्रॅमप्रमाणे घडणावळ निश्चित असते.

प्रति ग्रॅम फ्लॅट रेटनुसार जेव्हा मेकिंग चार्ज लावतात

उदा. सोन्याची किंमत 60000 रुपये प्रति 10 ग्राम आहेत.

20 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत - 5000 रुपये प्रति ग्रॅम X 20 ग्रॅम = 1 लाख रुपये

मेकिंज चार्ज -20 ग्रॅम X 300 रुपये प्रति ग्रॅम = 6000 रुपये

एकूण कॉस्ट  = 106000 रुपये

जेव्हा टक्केवारीप्रमाणे घडणावळ असते

दोन तोळ्याच्या सोन्याच्या किमतीचे प्रतितोळा 5 हजारांप्रमाणे X 20 ग्रॅम = 1 लाख रुपये.

मेकिंग चार्ज - 1 लाख रुपयांचं 12 टक्के = 12 हजार रुपये

एकूण कॉस्ट = 112000 रुपये

त्यामुळे जर तुम्हाला सोन्याच्या दागिन्याची खरेदी करायची असेल, तर दुकामात गेल्यावर नमेकिंग चार्जेस म्हणजे घडणावळ नेमकी किती आहे आणि तिचे मापन त्या दुकानात कसे केले जाते, हे माहिती करुन घेऊनच खरेदी करा.