balasaheb thackeray



maharshtra- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आज (17 नोव्हेंबर) पुण्यतिथी. बाळासाहेबांचं वयाच्या 86 व्या वर्षी 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झालं. देशातील स्पष्टवक्ते, सडेतोड भाषण करणारे हिंदू नेते म्हणून आजही बाळासाहेबांची आठवण काढली जाते. 

बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार (cartoons) होते. त्यांच्या कुंचल्यातून निघालेल्या फटकाऱ्यांनी देशातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य केलं. त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेलं हे पुण्यस्मरण.



बाळासाहेबांनी मुंबईतील द फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी इतर वृत्तपत्रांसाठी मुक्त पत्रकार म्हणूनही काम केलं. बाळासाहेबांनी 1953 मध्ये टाइम्समध्ये काढलेलं व्यंगचित्र (cartoons).



फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून बाळासाहेबांनी 1960 मध्ये स्वत: चं मार्मिक हे राजकीय साप्ताहिक सुरु केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आघाडीचे नेते होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 1949 मध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये त्यांनी काश्मीरमधील युद्धबंदीवर टीका केली आहे.




मुंबईतील वाढणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रभावावर टीका करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवरही आपल्या व्यंगचित्रांतून भाष्य केलं आहे. 2 9 नोव्हेंबर 1948 ला महागाईवर बाळासाहेबांनी काढलेलं हे कार्टून प्रसिद्ध झालं होतं.