
.Must Read
1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट
2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू
3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक
5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत
एकीकडे सर्व ठिकाणी दिवाळी सणाचे आनंदपूर्ण वातावरण असताना मात्र दुसरीकडे वर्षभर खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेल्या आमराई मळा भागातील नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. नियोजनशून्य कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. तक्रारी, वारंवार सूचना करूनही लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. नोकरदार,शिक्षक, विद्यार्थ्यांसह या भागात शेतीक्षेत्र असल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची वर्दळ नियमित असते.
आता ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर समस्या मोठ्या प्रमाणात निर्मान होऊ शकतात. पावसामुळे रस्ते करता येत नसल्याची परिस्थिती सर्वांना माहीत आहे, पण पावसाळा संपून दोन महिने संपत आले तरी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभार समोर येत असल्याने खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे, अशा संतापाच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.
आंदोलनावेळी मधुकर मुसळे,सचिन वरपे, उत्तम साळुंखे, राजेंद्र गुरव,सुरज येलाज,विजय पाटील, रोहित जाधव, ओम गुरव, मोहित कोळेकर,प्रल्हाद टिकारे, पिंटू जाधव, किरण लंगोटे, अण्णा मिठारे,दिलीप शिंदे, डी.डी. कुलकर्णी यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.