baba ramdev

बाबा रामदेव (baba ramdev) यांनी सांगितलं, 'मी आणि आमची संस्था लोकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करत आहोत.' बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, येत्या काळात बाबा रामदेव 5 लाख तरुणांना रोजगार (employment) देणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली आहे.

‘पतंजलीचा टर्नओव्हर 25 हजार कोटी होणार’

व्यवसायाबद्दल बोलताना बाबा रामदेव (baba ramdev) म्हणले, 'भारताबाहेरच्या कंपन्या आपल्या देशाला लूटत आहेत. जी लोकं ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड आणि केंम्ब्रिज विद्यापीठामधून शिकून आले आहेत त्यांना हा बाबा रामदेव स्वत:च्या गुरुकूलमध्ये शिकवणार आहे. यावर्षी पतंजली कंपनीचा टर्नओव्हर 25 हजार करोड होणार आहे.’ असं भाकितही बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यामुळे रोजगाराच्या (employment) नव्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले.

Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी


लॉकडाऊन आणि कोरोनामुळे (coronavirus) अनेकांनी स्वत:च्या नोकऱ्या गमवल्या आहेत. पण यामुळे निराश न होता स्वत:चा उद्योग सुरू करा, स्वदेशी जीवनपद्धती स्वीकारा असं आवाहन बाबा रामदेव यांनी लोकांना केलं आहे. ‘MNC सांस्कृतीक आणि आर्थिक गुलामी योग्य नाही. आपल्याला साम्राज्यवाद झुगारुन द्यायचा असेल तर स्वदेशी जीवन पद्धतीचा मार्ग अवलंबल्याशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले.’

चिनी वस्तू खरेदी करणाऱ्यांना योग गुरू बाबा रामदेव यांनी आठवण करुन दिली की, फटाक्यांपासून मोबाईलपर्यंत जी लोकं चायनिज मालावर अवलंबून आहेत ती दहशतवादाला पाठिंबा देत आहेत. कारण तुमच्या पैशांमुळे चीनचा नफा होतो. आणि तो पैसा चीन पाकिस्तानला देतो. पाकिस्तानचे दहशतवादी आपल्याच देशातील अशांतता पसरवत आहेत.