इचलकरंजी येथे पूर्ववैमनस्यातून जर्मनी गँगच्या चौघांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात आकाश संजय वासुदेव (वय 30 रा. जवाहरनगर) आणि सुनिल वाघवे हे दोघे जखमी झाले असून वासुदेव याच्या हाताची बोटे तुटली आहेत. जखमींवर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जवाहरनगर परिसरातील गणपती मंदिरानजीक घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरात राहण्यास असलेल्या आकाश वासुदेव आणि लिगाडे मळा परिसरातील सुनिल वाघवे यांचे जर्मनी गँगचा अभि तेरणे याच्याशी पूर्ववैमनस्यातून वाद होता. या वादातूनच तेरणे याने साथीदारांच्या मदतीने वाघवे याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. वाघवे याच्याकडे वासुदेव याच्यासंदर्भात विचारणा केली असता तो कोठे आहे याची माहिती नसल्याचे वाघवे याने सांगितले. दरम्यान वासुदेव हा गणपती मंदिर परिसरात आला असल्याचे समजल्यानंतर तेरणे याच्यासह चौघांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. 

त्यामध्ये वासुदेव याच्या डोकीत आणि हातावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात वासुदेव याच्या हाताची बोटे तुटल्याचे समजते. घटनेनंतर हल्लेेखोर पसार झाले. जखमी वासुदेव याला नागरिकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वासुदेव याच्या समर्थकांसह नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. वासुदेव हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते.