ashish-shelar-on-maratha-woman-will-be-next-cm

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelarयांनी शरद पवार यांच्यासमोर केल्यानं भुवया उंचावल्या आहेत. आशिष शेलार यांचा रोख निश्चितच सुप्रिया सुळे यांच्या दिशेने होता. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackerayयांची अस्वस्थताही वाढवली आहे. इतकंच नाही तर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिला आहे.

पत्रकार विजय चोरमारे यांच्या "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

Must Read

1) Coronavirus: पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?

2) COVID19 : पंढरपूरमध्ये कर्फ्यूची घोषणा

3) भारतीय सीमेत दोन पाकिस्तानी ड्रोन्सची घुसखोरी; BSF जवानांनी दिलं सडेतोड उत्तर

4) फक्त बदाम खाणं पुरेसं नाही; स्मरणशक्ती वाढण्यासाठी करा सोपे 6 उपाय

5) इथं कराल हनीमून तर होईल घटस्फोट

6) अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला. महारावांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी तोंडासमोर तेच पुस्तक धरून तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात शेलार यांनी महारावांच्या या वक्तव्याला उत्तर देताना हे खळबळजनक वक्तव्य केलं. 

शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणारी व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही, असंही वक्तव्य आशिष शेलार यांनी यावेळी केलं. आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा रोख कुणाकडे आहे, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.