martyrkolhapur- आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र (martyr) ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शत्रूशी लढताना वीरमरण आलेला पुत्र आज अनंतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये शत्रूच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले. आज त्यांच्या गावी त्यांना भडाग्नी देण्यात आला.

ऋषीकेश यांचे पार्थिव आज पहाटे कोल्हापूरमध्ये (kolhapur) दाखल झाले. कोल्हापूरमध्ये मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश (martyr) यांच्या मुळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला. 

Must Read

1) सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

2) 'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

3) हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खरेने केले फोटोशूट

4) राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाच अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रुंचा बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला. अंतयात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. 

याठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक,समरजीतराजे घाटगे, माजी आमदार संजय घाटगे,  जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून  मानवंदना देण्यात आली. यावेळी भारत माता की जयचा जयघोष झाला.

भाऊबीजे दिवशी पार्थिवाला ओवाळले

आज भाऊबीज असल्याने सर्वत्र बहीण भावाला ओवाळते. हुतात्मा ऋषीकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे. मात्र या दुर्दैवी बहीणीवर ऋषीकेश यांच्या पार्थिवाला ओवाळाव लागलं. हा प्रंसग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला.