politics news in maharashtra - sharad pawarpolitics news in maharashtra -  महाराष्ट्राची मुख्यमंत्री कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग समाजात आहे. याला माझ्यासारख्या माणसाचेसुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असे वक्तव्य करीत भाजप नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच शेलार यांच्या या शाब्दिक फटकेबाजीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

पत्रकार विजय चोरमारे लिखित ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

Must Read

1) भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

2) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री यावी - आशिष शेलार

3) 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव

4) सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

पुस्तक प्रकाशनानंतर महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा केला. यानंतर पुस्तकावरील आपल्या भाषणात शेलार यांनी महारावांच्या या वक्तव्याला उत्तर देताना ‘कर्तृत्ववान मराठी स्त्री राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आल्यास आपले शंभर टक्के समर्थन असेल,’ असे विधान केले. पवारांच्या उपस्थितीतील या विधानानंतर शेलार यांचा रोख सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकाचवेळी महाविकास आघाडीसह भाजपलाही त्यांनी एक प्रकारे इशारा दिल्याचे मानलेजात आहे.(politics news in maharashtra)

शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरेच लोक बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत. मला कुणाशी तुलना करायची नाही, असेही शेलार या वेळी म्हणाले. या विधानाचा रोख कुणाकडे, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.