entertainment newsentertainment news-आपल्या कसदार अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे सान्या मल्होत्रा. दंगल चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी सान्या अलिकडेच ‘लुडो’ या चित्रपटात (movie) झळकली. या चित्रपटात सान्याने अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सान्या आणि आदित्यचा बोल्ड सीन (film scene) सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. हा सीन नेमका कसा चित्रीत झाला आणि त्यावेळी सान्याची नेमकी अवस्था कशी झाली होती हे तिने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Must Read

1) धोनीने संधी दिलेल्या फास्ट बॉलरची क्रिकेटमधून निवृत्ती

2) जयसिंगरावांनी पक्ष सोडला, पंकजा मुंडेंनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

3) ...नाहीतर तुमचे सगळे धंदे बाहेर काढणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा

4) RBI ची मोठी घोषणा!

5) पठ्ठ्याने खरोखरच किडनी विकून आयफोन घेतला

“लुडो चित्रपटात मी आदित्यसोबत काम करणार हे मला समजल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाला. मात्र, आदित्यसोबत या चित्रपटात माझे बोल्ड सीन असल्याचं लक्षात आल्यानंतर मला फार अवघडल्यासारखं झालं होतं”, असं सान्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, “बोल्ड सीन (film scene) देताना मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं, कारण आजुबाजूला बरेच लोक होते, कॅमेरा होता त्यामुळे मी फार नर्व्हस झाले होते. एक तर मी यापूर्वी आदित्यला फारशी ओळखत नव्हते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हे बोल्ड सीन देताना त्याने मला फार कंफर्टेबल केलं. माझ्या मनातील भीती आणि अवघडलेपणा त्याने कमी करण्यास मदत केली”.

‘लुडो’ हा चित्रपट (movie)नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील लग्नाआधीची सान्या आणि आदित्यची सेक्सक्लीप सोशल मीडियावर व्हायरल होते. आणि ही क्लीप सोशल मीडियावरुन काढून टाकण्याच्या मिशनसाठी ते दोघं एकत्र येतात असं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रासोबतच, पंकज त्रिपाठी, अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख, रोहित शराफ, आशा नेगी या कलाकारांनी काम केलं आहे.