entertainments newsentertainments news- ‘पवित्रा रिश्ता’ ही मालिका ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर (social media)चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. दिवाळीनिमित्त अंकिताने तिच्या मित्र-मैत्रिणी व बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यावरून ती ट्रोल (troll) झाली आहे.

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका

दिवाळीनिमित्त लाल रंगाचा लेहंगा परिधान करत अंकिताने एक प्रमोशनल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला होतो. या व्हिडीओत तिने साजश्रृंगार करून हातात दिव्यांचा ताट घेतला आहे. यासोबतच तिने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. 

हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (troll) केलं आहे. “तु एसएसआरला (सुशांत सिंह राजपूत) विसरलीस का.”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने तिला विचारला आहे. तर “जस्टीस फॉर एसएसआरचं काय?”, असा प्रश्न दुसऱ्याने विचारला. एकाने तर ‘तुला पाहिल्यावर एसएसआरची आठवण येते’, असं म्हटलं. (entertainments news)

सुशांतने १४ जुलै रोजी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली होती. सुशांतला न्याय मिळावा यासाठी अंकिता त्याच्या कुटुंबीयांसोबत सोशल मीडियावरी मोहिमेत सहभागी झाली होती.