sheep market


देशभरासह राज्यातील कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून ठप्प झालेले व्यवहार आता सध्या हळूहळू सुरु होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगली मधील जनावारांचा बाजार (animal)ओळख असणाऱ्या आटपाडीत एक बकरा विक्री आणला होता. या बकऱ्याची किंमत हजर किंवा लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये होती. या बकऱ्याची किंमत ऐकताच सर्वजण थक्क झाले खरे पण त्याला विकत घेण्यासाठी एक व्यक्ती पुढे आला. पण त्याने तो बकरा लाखो रुपयांना खरेदी करतो असे म्हटले.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

आटपाडीतील आणलेला मोदी बकरा (animal) त्याची किंमत मालकाने तब्बस दीड कोटी रुपये लावली होती. या बाजारात एकाने या मोदी बकऱ्यासाठी 70 लाख रुपये देतो असे म्हटले. परंतु मालकाने ती रक्कम नाकारत आपण दीड कोटी रुपयांवरच ठाम असल्याचे म्हटले. तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटकात आटपाडी यात्रा असते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मालक आपल्या गुरुंना घेऊन येतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ती यात्रा रद्द करण्यात आली. पण जनावरांचा बाजार भरवण्यास रविवार आणि सोमवारी परवानगी दिली गेली. त्याचवेळी हा प्रकार घडला आहे.

तसेच मोदी बकऱ्याच्या कोकरुची किंमत 13 लाख रुपये ठेवली गेली होती. सोमनाथ जाधव यांनी त्याची खरेदी 2 लाखांना केली होती. त्याचसोबत अन्य तीन मेंढ्यांची किंमत शेतकऱ्यांकडून 9 लाख रुपये सांगितली. तर जवळजवळ सात-आठ महिन्यांनी सुरु झालेल्या बाजारात जनावरांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.