anand-mahindra-share-photo

 देशातील अनेक भागात विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात. पण बिहारमधील भागलपूर येथील इंतसार आलम नावाच्या एका शौकिनाने थेट गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी घराच्या छतावर बसवली आहे.

स्कॉर्पियो (Scorpio) गाडीच्या आकाराची ही टाकी असून याला नंबर प्लेट देखील आहे. ही गाडी एवढी हुबेहूब आहे की नवखा व्यक्ती या भागात आल्यास त्याला घरावर गाडी पार्क केली की काय असाही भास यामुळे होतो. त्यामुळे याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. स्कॉर्पियो गाडी बनवणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Mahindra Group Chairman Anand Mahindraदेखील हा फोटो शेअर करण्यावाचून स्वतःला रोखू शकले नाहीत.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. आता यालाच एक राईज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ रायजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला सलाम, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. महिंद्रा यांच्या ट्विटला अनेकांनी रिप्लाय दिला असून यात त्यांनी बनवलेल्या विविध गाड्यांच्या आकारातील टाकीचे फोटो शेअर केले आहेत.