laxmi-laxmiअभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumarचा चित्रपट लक्ष्मीवरून संपूर्ण देशात मोठा वाद दिसून येत आहे. आता तर या चित्रपटावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे, धमक्या देण्यात येत आहेत आणि बॅन करण्याची मागणी होत आहे. हा वाद सुरू असतानाच निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलले आहे. आता चित्रपट लक्ष्मी बॉम्ब ऐवजी केवळ लक्ष्मी असणार आहे. टायटल बदलल्याने निर्मात्यांची अडचण थोडी कमी होऊ शकते.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

लक्ष्मीचे नवीन पोस्टर रिलिज

आता अक्षय कुमारने लक्ष्मीचे सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर रिलिज केले आहे. पोस्टरमध्ये कियारा आडवाणी (Kiara Advani) एकदम नव्या लूकमध्ये दिसत आहे. तर पोस्टरमध्ये अक्षयसुद्धा लक्ष्मीच्या रूपात दिसत आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर पाहून चाहते आनंदित झाले आहेत. चित्रपटाचे नवे पोस्टर शेयर करत अक्षयने लिहिले आहे की – आता प्रत्येक घरात येईल लक्ष्मी, कुटुंबियांसह तयार रहा 9 नोव्हेंबरला. अक्षयच्या या संदेशाने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.

काहीही असले तरी अक्षयची लक्ष्मी पहाण्यासाठी चाहते वाट पहात आहेत. या अगोदर अक्षयने चित्रपटात अशी भूमिका केलेली नाही. ट्रेलरने सुद्धा चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत, चित्रपटाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर रिलिज केला जात असला तरी इतर अनेक देशात तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्या देशांमध्ये कोरोनचा प्रकोप कमी आहे आणि जिथे थिएटर खुली आहेत, तिथे लक्ष्मी रिलिज केला जाणार आहे.

कपिलच्या शोमध्ये अक्षय

अक्षय कुमार सध्या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता तो द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे. शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर वायरल होत आहे. प्रोमोमध्ये कपिल एकीकडे अक्षयचा पाय ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर अक्षय, कपिलची मस्करी करत आहे. याच रविवारी हा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. अक्षय, कियारासोबत सेटवर येणार आहे.