ajit pawar


politics- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या बारामतीत पहिल्यांदाच नगर पालिकेवर काळे झेंड फडणण्याची घटना घडली होती. अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलावले आहे.

आज दुपारी  बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवले होते. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

बारामतीत नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळणेबाबत काळे झेंडे फडकवून निषेध केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे.  या बैठकीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन करत आहे.  पण, त्यांच्या आंदोलनाची कुणीही दखल घेतली नाही.  नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी आणखी संतप्त झाले. त्यामुळे आज थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केलं आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

विशेष म्हणजे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आल आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्यानं दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.