telecom company


टेलीकॉम कंपन्यांकडून (telecom company) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर आणत असतात. अनेकदा फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफरही टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना दिली जाते. एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 5 जीबीपर्यंत फ्री (internet data) डेटा मिळतोय. 


Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का


एअरटेलची ही ऑफर New 4G SIM or 4G Upgrade Free Data Coupons या नावाने बाजारात आलीये. याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये 5 जीबी डेटा देत आहे. हा डेटा एक-एक जीबीच्या पाच कुपनद्वारे मिळेल. यातील पहिला एक जीबी डेटा Airtel Thanks अ‍ॅप (telecom company) डाउनलोड केल्यानंतर मिळेल. मात्र ही ऑफर पहिल्यांदा एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांसाठीच आहे. याशिवाय एअरटेलचं नवं सिम कार्ड घेणाऱ्यांना किंवा जुनं 3जी सिम कार्ड 4जीमध्ये अपग्रेड करणाऱ्यांनाच या ऑफरचा (internet data) लाभ मिळेल.

ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी पहिल्यांदा एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करुन मोबाइल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन करावं. सिम घेतल्यानंतर ३० दिवसांमध्येच रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये एक-एक जीबीचे पाच कुपन 72 तासांमध्ये मिळतील.