smoking

धुम्रपानाची (smoking) सवय ही शरीरासाठी अत्यंत घातक असते. या सवयीमुळे व्याधींना निमंत्रण मिळतं, हे माहित असताना देखील अनेक मंडळी सिगरेटचं व्यसन करतात.अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या व्यसनाच्या विळख्यात अडकलेले आपण पाहिले आहेत. 


परंतु या जिवघेण्या विळख्यातून अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती मात्र सहज बाहेर पडली आहे. तिने सिगरेटला कायमचा रामराम ठेकला आहे. परंतु ही अभिनेत्री धुम्रपानाच्या (smoking) व्यसनातून बाहेर पडली तरी कशी? सुमनाने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना या व्यसनातून बाहेर पडण्याचा सोपा उपाय सांगितला आहे.

Must Read

1) जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

2) जेलमधून सुटल्यानंतर अर्णब गोस्वामीचं शक्तीप्रदर्शन

3) शेअर बाजार तेजीतच; गुंतवणूक ‘करेक्शन’नंतर

4) HIV टाळण्यासाठी दररोज औषध घेण्याची नाही गरज पण...

5) रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणाला...

ती म्हणाली, "माझा धुम्रपान करत असतानाचा एक फोटो दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला होता. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली." "काहींनी ट्रोल कलं तर काहींनी मला सिगरेट सोडण्याचा सल्ला दिला. टीकेकडे मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं पण सल्ल्यांकडे मात्र मी दुर्लक्ष करु शकले नाही."

"त्यानंतर मी सिगरेट सोडण्याचा निश्चय केला. धुम्रपान सोडणं अत्यंत कठीण वाटत होतं. हळूहळू त्याची सवय झाली." "धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीसमोर मी उभं राहणं टाळायची. सिगरेटची तलफ आली की मी च्युइंगम चघळायची. भरपूर पाणी प्यायचे. शिवाय सिगरेट शरीरासाठी किती घातक आहे याबद्दल सतत वाचायचे, परिणामी हळूहळू माझं धुम्रपानाचं व्यसन सुटलं." "तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा."