
Must Read
1) रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
2) अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर
3) ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार
4) "शरद पवार अजितदादांना नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”
5) त्या आजाराने गेला असता बाहुबलीच्या भल्लालदेवचा जीव
मुळची हिमाचलची असणारी मालवी हिने हिंदी मालीका तसेच काही सिनेमांमध्ये काम केले आहे. मालवी हिला योगेश महिपाल सिंग या निर्मात्याकडून लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता. फेसबुक (facebook) च्या माध्यमातून ओळख झालेल्या या ेगेशचे मालवीवर एकतर्फी प्रेम होते. याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश सिंग याने मालवीवर चावूâने चार वेळा हल्ला केला. या हल्ल्यात मालवी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मालवीच्या वडीलांनाही या घटनेनंतर धमकावण्यात आले आहे. घराखाली पेâरी मारत असताना एका बाईकस्वाराने येऊन मालवीच्या वडिलांना योगेश लवकरच बाहेर येईल, नंतर आम्ही बघुन घेऊ अशी धमकी देत तेथुन पळ काढला. यानंतर पुन्हा एकदा मालवीने पोलीसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
घराबाहेर बोलवून केला हल्ला
मालवीने केलेल्या तक्रारीत आरोपी योगेश याने काही कामाचे निमित्त काढून आपल्याला घराबाहेर बोलवल्याचे सांगितले आहे. सोमवारी रात्री मालवी घराबाहेर पडली असता योगेश आपल्या ऑडी कारच्या बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता. यावेळी भररस्त्यात मालवीला अडवून लग्नासाठ दबाव टाकत असताना त्याला विरोध केला म्हणून योगेश याने मालवी वर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर योगेश घटनास्थळावरून फरार झाला.
सीसीटीव्ही फुटेजने केला उलगडा
हल्ला करून फरार झालेल्या योगेश सिंगच्या मुसक्या आवळण्यात वर्सोवा पोलीसांना यश आले. यासाठी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने योगेशला ट्रॅक करण्यात आले.
या तीन भाषांमध्ये केले आहे काम
अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिने आतापर्यंत तीन भाषांमध्ये काम केले आहे. यामध्ये तेलुगू सिनेमा ‘कुमारी २१ एफ’, तमिल सिनेमा ‘नदिक्कू एंडी’, हिंदी सिनेमा ‘होटल मिलन’, हिंदी मालिका ‘उड़ान’ यामध्ये मालवी झळकली आहे.