
लोकांनी यांना मान सन्मान दिला, निवडून दिलं. हीच लोक वेळ आली तर खाली खेचतात. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार राहातील, असा इशारा देखील यावेशी त्यांनी दिला.
खासदार उदयनराजे पत्रकारांनी संबोधित करताना म्हणाले की, 'मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षांपासून झालं आहे. मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?' असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.
Must Read
1) राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी
2) शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे
3) 'भाजपमधून लवकरच ते नेते राष्ट्रवादीत येणार'
4) 1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल
5) अनैतिक संबंध तोडले म्हणून महिलेची अश्लील छायाचित्र मुलांना पाठवली
6) लग्न समारंभातून घरी जाताना तरुणांवर काळाचा घाला
आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.
जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.