इचलकरंजी येथे रिक्षातून बेकायदेशीपणे मद्याची वाहतूक करणार्‍या एकास गावभाग पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. रफिक सैफुद्दीन सय्यद (वय 40 रा. हनुमाननगर जवाहरनगर) असे त्याचे नांव असून या कारवाईत विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी मद्याच्या 345 बाटल्या व रिक्षा असा सुमारे 1 लाख 366 रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Must Read

1) आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर

2) राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनणार की इतरांना संधी मिळणार?

3) सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आताचे दर

4) इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलाची माघा

5) Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरातील मुख्य मार्गावरुन रिक्षातून बेकायदेशीरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गावभाग पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने महात्मा गांधी पुतळा ते कॉ. के. एल. मलाबादे या मार्गावर तपासणीवेळी संशयावरुन एक रिक्षा (क्र. एमएच 09 यु 9561) पकडली. रिक्षाचालक रफिक सय्यद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करत रिक्षाची झडती घेतली. त्यामध्ये देशी-विदेशी मद्याच्या  विविध कंपन्यांच्या 45 हजार 366 रुपयांच्या 345 बाटल्या मिळून आल्या. या कारवाईत 55 हजार रुपयांच्या रिक्षासह एकूण 1 लाख 366 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.